My School माझी शाळा

 My School माझी शाळा

माझी शाळा

पुन्हा एकदा बालपण दिले तर

मी माझ्या शाळेत जाईन

पावसाळ्यात एकाच छत्रीत दोघे मित्र

खांदे भिजवत शाळेत येऊ

पुन्हा एकदा बालपण दिले तर

खापराचा पाटीवर पेन्सिलने गीरावीन

मित्रांशी गट्टी कधी कट्टी

बाई वर्गात येईपर्यंत धिंगाणा घालीन

पिटीचा तासाला मन भरून खेळेल

पुन्हा एकदा बालपण दिले तर

पोटात दुखतंय म्हणून दांडी मारील

शाळा भरायचा एक तास आगोदर गृहपाठ करील

शेवटच्या तासाला घंटा कधी वाजतेय याची वाट बघेन

शाळा सुटल्यावर शाळा सुटली पाटी फुटली

असं म्हणत घराकडे पळत जाईन

पुन्हा एकदा बालपण दिले तर…


माझी शाळा कविता

दिसायला ही दगड विटा फड्शीची

शाळेत आल्यावर समजलं या फक्त चार भिंती

दोन खिडक्या, दरवाजा आणि फळा नाही

ज्ञान मूल्यशिक्षण खेळ शिस्त आणि खुपकाही

सगळ्यात महत्वाचं म्हणजे नातं

गुरु शिष्याच  मैत्रीच नातं

शाळेत आल्यावर मिळाल

शाळेने मला जिवलग मित्र दिले

याच एका मित्राचा यादीतला एक मित्र म्हणजे पुस्तक

जो जुन्या मोजक्या मित्रांप्रमाणे आजही माझ्या सोबत आहे

अशी माझी शाळा


मला पुन्हा शाळेत जायचय

शाळेचे ते दिवस आठवले की …

उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….

bus -stop ची मागची ती शाळा पाहून ,

पुन्हा शाळेत जावसं वाटतं ….

शाळा आमची छान होती …

Last bench वर आमची team होती ….

Cricket च्या वेळी ground वर cheating व्हायची …

आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन मधल्या वडा-पाव साठी ….

साला नेहमीच line असायची …

जन-गण-मन ला कधी कधी ..

शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …

प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….

प्रतिज्ञा म्हणायचो …

प्रार्थनेच्या वेळी मात्र …. सगळ्यांसारखे …

नुसतेच ओठ हालवायचो ….

पावसाळ्यात शाळेत जाताना ,

छत्री दप्तरात ठेऊन …. मुद्दामच भिजत जायचं …

पुस्तक भिजू नये म्हणून ….

त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….

शाळेतून येता येता … एखाद्या डबक्यात उडी मारून …

उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं ….

Black -board वर बोलणार्या मुलांमध्ये ….

Monitor नेहमीच आमचं नाव लिहायचा …

नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे …

हातावर duster चा व्रण असायचा ….

प्रयेत्येक Off -period ला P.T. साठी ….

आमचा आरडाओरडा असायचा …

शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा ….

तो बर्फाचा गोळा संपवायचा ….

मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही ….

कधी कोणी link नाही लावायचं …

प्रत्येक महिन्यातून एकदातरी …

डोक्यावरचे केस कापायचो …

आणि आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात ….

शिव्या सूद्धा नाही द्यायचो …

इतिहासात वाटतं …. होता शाहिस्तेखान …

नागरिक शास्त्रात पंतप्रधान ….

गणित… भुमितीत होतं … पायथागोरस च प्रमेय …

भूगोलात वाहायचे वारे …. नैऋत्य … मॉन्सून …

का कुठलेतरी … वायव्य….

हिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा”

English मधल्या grammar नेच झाली होती आमची व्यथा …

शाळेतल्या gathering चा dance …

बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा … तो मराठी चा तास ….

दरवर्षी नवीन भेटायचे ….

Uniforms आणि वह्या पुस्तकांचा set …..

पण नवीन दप्तरासाठी नेहमीच करावा लागायचा wait ….

शाळा म्हटली कि अजूनही आठवतात ….

desk वर pen ने त्या “pen fights” खेळणं ….

exams मधल्या … रिकाम्या जागा भरणं … आणि जोड्या जुळवणं …

चिखलातल्या त्या football च्या matches …

कबड्डीत … पडून धडपडून ….

हातापायांवर आलेले scraches …

खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा ….

मला पुन्हा लहान व्हायचं ….

हसायचं …. खेळायचं ….

मला पुन्हा शाळेत जायचं ….


शेजारील पिंटुचे,काल मला दप्तर दिसले.
नकळत माझे मन मग,बालपणात गेले.

आठवले सर्वकाही,आठवली ती शाळा.
आठवला तो सुविचार लिहलेला,सुंदरसा फळा.

आठवला तो गणवेश,आठवली ती सॅक.
गळ्यात अडकवलेली,छोटीशी वॉटरबॅग.

आठवली ती प्रार्थना,आठवले ते जनगणमन.
सरळ रांगेत उभे राहण्याची,चाललेली चणचण.

पहिल्या बाकासाठी,झालेला मित्रांशी तंटा.
आठवली ती घणघणारी,मोठी पितळी घंटा.

आठवले ते दिलेले रोज,आईने आठ आणे.
मधल्या सुटटीतल्या खाऊसाठी,चिँच आणि चणे.

आठवला सरांचा तो,पाठीवरचा मारा.
आठवला वहीवरचा तो,लाल अपुर्ण शेरा.

आठवले ते शाळेसमोरील,मैदान स्वरुपी अंगण.
डब्बा खाण्यासाठी केलेले,सवंगड्यांचे रिँगण.

आठवले ते मैदान,आणि PE चा तो तास
फुटबॉल आणि क्रिकेटचा वेगळाच उल्हास.

आठवतात ते पाढे,आणि आठवते ती परिक्षा
कमी मिळाले गुण म्हणुन,केलेली शिक्षा

आठवतात ते गुरुजी आणि त्या बाई.
मित्रासोबत शाळेत जाण्याची,केविलवाणी घाई

अशी माझी शाळा,मला बालपणात नेते.
तिच्या आठवणिने डोळ्यात पाणि ठेऊन जाते

दिलेस तर देवा,एकच वरदान दे मला.
पाठीवरती दप्तर टाकुन,पुन्हा शाळेत जायचय मला..
पाठीवरती दप्तर टाकुन,पुन्हा शाळेत जायचय मला…Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *