Vithu Mauli Tu Mauli Jagachi Song Lyrics विठुमाऊली तू माऊली जगाची

Vithu Mauli Tu Mauli Jagachi Song Lyrics

विठुमाऊली तू माऊली जगाची
Vithu Mauli Tu Mauli Jagachi

Vithu Mauli Tu Mauli Jagachi :

Vithu Mauli Tu Mauli Jagachi विठुमाऊली तू माऊली जगाची

विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची

काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलिया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची

लेकरांची सेवा केलीस तू आई
कस पांग फेडू कस होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची

पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची

गीतकार : जगदीश खेबुडकर, गायक : सुधीर फडके - सुरेश वाडकर -जयवंत कुलकर्णी, 
संगीतकार : अनिल-अरुण, गीत संग्रह / चित्रपट : अरे संसार संसार (१९८१)
Lyricist : Jagdish Khebudkar, Singer : Sudhir Phadke - Suresh Wadkar - Jaywant Kulkarni, 
Music Director : Anil-Arun, Movie : Are Sansar Sansar (1981)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *