Marathi/Hindi Kavita

Marathi/Hindi Kavita

Marathi Hindi Kavita

सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात……

 

मैत्री असावी अशी… मैत्रीसारखी
हसत राहणारी.., हसवत राहणारी…
संकटकाळी हात देणारी…
आनंदी समयी साद घालणारी…
मनाची कवाडे उघडून डोकावणारी…
काहीं गुपितांचे राखण करणारी…
मन मोकळे करुन सारं सांगणारी…
सांगता सांगता मोहीत करणारी…
कधी कुणाला न लुटणारी…
चांगल्याच कौतुक करणारी…
तितकीच चूका दाखविणारी…
शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी…,
मैत्री असावी अशी… मैत्रीसारखी

 

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं
अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो
Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो
Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत
आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती
चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो
खुप आठवतात ते दिवस…
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं………….

 

कुणीतरी हव असत……
कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार
हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्….
कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार
फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्……
कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार,
चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार……..
कुणीतरी हव असत ,आपल म्हननार
नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार……..
कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,
कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार……..
कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,
कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार……
कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,
स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार………
कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,
माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार….
कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,
माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार…..

 

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.
आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.
भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.
गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर पण
Movie सुध्धा enjoy करता आली पाहिजे.
कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.
सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
‘फ़ुलपाखरान्च्या’ सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.
द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल ?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या .
रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या ,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा

 

कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,
गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते….
गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,
तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते….
अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात….
आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!!!

 

दोस्ती नाम नहीं सिर्फ़ दोस्तों के साथ रेहने का..
बल्कि दोस्त ही जिन्दगी बन जाते हैं, दोस्ती में..
जरुरत नहीं पडती, दोस्त की तस्वीर की.
देखो जो आईना तो दोस्त नज़र आते हैं, दोस्ती में..
येह तो बहाना है कि मिल नहीं पाये दोस्तों से आज..
दिल पे हाथ रखते ही एहसास उनके हो जाते हैं, दोस्ती में..
नाम की तो जरूरत हई नहीं पडती इस रिश्ते मे कभी..
पूछे नाम अपना ओर, दोस्तॊं का बताते हैं, दोस्ती में..
कौन केहता है कि दोस्त हो सकते हैं जुदा कभी..
दूर रेह्कर भी दोस्त, बिल्कुल करीब नज़र आते हैं, दोस्ती में..
सिर्फ़ भ्रम हे कि दोस्त होते ह अलग-अलग..
दर्द हो इनको ओर, आंसू उनके आते हैं , दोस्ती में..
माना इश्क है खुदा, प्यार करने वालों के लिये “अभी”
पर हम तो अपना सिर झुकाते हैं, दोस्ती में..
ओर एक ही दवा है गम की दुनिया में क्युकि..
भूल के सारे गम, दोस्तों के साथ मुस्कुराते हैं, दोस्ती में..

 

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री………..

 

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..
एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..
एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..
एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात…

 

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.
काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.
मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात

 

“आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली
सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते
करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो
मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या शणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले
का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे
सापडेल का या शणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा”

 

गंध आवडला फुलाचा म्हणून… … फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….
परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….
आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे…
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….
आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं…
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं…
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं
अशावेळी….
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

 

गंध आवडला फुलाचा म्हणून… … फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….
परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….
आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे…
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….
आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं…
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं…
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं
अशावेळी….
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला…
ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी…
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ…..
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे…
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे

 

बोलण्यासारखे खुप आहे, सांगण्यासारखे काहीच नाही;
करण्यासारखे खुप आहे, होण्यासारखे काहीच नाही…..
कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे, दुखण्यासारखे काहीच नाही…..
उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर, बघण्यासारखे काहीच नाही…..
तुला नेहमीच वाटत असेल, मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे, कळण्यास अवघड काहीच नाही…..
माझ्या नेत्रांतील आसवांची, तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत, नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत

 

क्यूं कहते हो मेरे साथ कुछ भी बेहतर नही होता
सच ये है के जैसा चाहो वैसा नही होता
कोई सह लेता है कोई कह लेता है क्यूँकी ग़म कभी ज़िंदगी से बढ़ कर नही होता
आज अपनो ने ही सीखा दिया हमे
यहाँ ठोकर देने वाला हैर पत्थर नही होता
क्यूं ज़िंदगी की मुश्क़िलो से हारे बैठे हो
इसके बिना कोई मंज़िल, कोई सफ़र नही होता
कोई तेरे साथ नही है तो भी ग़म ना कर
ख़ुद से बढ़ कर कोई दुनिया में हमसफ़र नही होता

 

तो मराठी मुलगा असतो !!
तो मराठी मुलगा असतो !!
कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वात साधा सुधा दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!
कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!
कंपनीमध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पन जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!
कंपनीत मुले सिगरेट पिऊन येतात
पन जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!
कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पन जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो !! …………

 

किसी के इतने पास न जा
के दूर जाना खौफ़ बन जाये
एक कदम पीछे देखने पर
सीधा रास्ता भी खाई नज़र आये
किसी को इतना अपना न बना
कि उसे खोने का डर लगा रहे
इसी डर के बीच एक दिन ऐसा न आये
तु पल पल खुद को ही खोने लगे
किसी के इतने सपने न देख
के काली रात भी रन्गीली लगे
आन्ख खुले तो बर्दाश्त न हो
जब सपना टूट टूट कर बिखरने लगे
किसी को इतना प्यार न कर
के बैठे बैठे आन्ख नम हो जाये
उसे गर मिले एक दर्द
इधर जिन्दगी के दो पल कम हो जाये
किसी के बारे मे इतना न सोच
कि सोच का मतलब ही वो बन जाये
भीड के बीच भी
लगे तन्हाई से जकडे गये
किसी को इतना याद न कर
कि जहा देखो वोही नज़र आये
राह देख देख कर कही ऐसा न हो
जिन्दगी पीछे छूट जाये
ऐसा सोच कर अकेले न रहना,
किसी के पास जाने से न डरना
न सोच अकेलेपन मे कोई गम नही,
खुद की परछाई देख बोलोगे “ये हम नही

 

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही..
प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही…
का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण…
मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही…
रात्री छान च असतात … तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला…
प्रेम कधी सफल होते तर कधी नाही… ते जीवनात कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्यात ते नेहमीच जपायाच असत…
प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही …
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *