भाषण : छत्रपती शिवाजी महाराज

भाषण : छत्रपती शिवाजी महाराज  (शालेय विद्यार्थ्यांसाठी)

भाषण : छत्रपती शिवाजी महाराज Speech on Shivaji Maharaj in Marathi :

“निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ।।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।

~ संत रामदासांनी अगदी योग्य असे ज्या महान व्यक्तीचे वर्णन केले आहे त्या देवासमान महापुरुषाचे नाव सर्व घराघरात ज्या आदराने आणि मायेने घेतले जाते, ज्याचे नाव घेताक्षणी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि ज्याच्या नावाचा उल्लेख सहजी जरी झाला तर आपले हात आपसूकच जोडले जातात त्या छत्रपती शिवाजी महाराज याना विनम्र अभिवादन. त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्यातील नेतृत्व गुण खुलून दिसायला सुरुवात झाली होती. त्यांचे सारे जीवन म्हणजे एक दैवी चमत्कारच होता. आई जिजाबाई ही केवळ आई नसून त्याना घडविण्यामधील दैवी शक्ती होती. लखुजी जाधवराव या निजामशाहीतील शूर सरदाराची मुलगी तर वडील शहाजीराजे भोसले अशा माता -पित्याच्या पोटी शिवाजीचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या वर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेस जुन्नर जवळ शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता. जडणघडणही तिथेच झाली.

तत्पूर्वी महाराष्ट्रातील जनतेवर मनसोक्त आणि बेफ़ाम राज्य केले ते आजुबाजूच्या परकीय सत्ताधिशांनी….जवळपास तीनशे वर्षे त्यांचा मनसोक्त राज्यकारभार चालत होता. तो जुलमीच होय. सर्वसाधारण जनतेवर अफ़ाट आणि अन्यायी कर लादणे आणि त्याची बळजबरीने वसुली करणे, जमिनी कष्टांनी आम्ही कसायच्या आणि आलेले सोनेरी पीक या जुलमजबरीची सवय झालेल्या मुर्दाडांनी बेमुर्वतखोरपणाने न्यायचे हा तर शिरस्ताच पडून गेला होता. स्त्रियांच्या अब्रुचे धिंडवडे निघायचे, पुरुषांना मुलाबाळांना गुलाम म्हणून राबवायचे आणि या लोकांनी ते विनातक्रार सहन करायचे म्हणजे गुलामीचीही जणू सवयच झाली होती. सत्तेपुढे शहाणपण कुचकामी सिद्ध झाले होते.मात्र शिवाजीराजांने हे दु:स्वप्न आपल्या पराक्रमाने नष्ट केले आणि मराठा सत्ता प्रस्थापित केली. हिंदुस्थान मुसलमानमय करून टाकावा या म्ह्त्वाकांक्षेने झपाटलेला औरंगजेब हा दिल्लीच्या तख्तावर होता.विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अस्या वेढ्यात सापडलेला पुणे-सुपे परिसर या तिन्ही मुस्लिम राज्यांवर औरंगजेबांची हुकुमत होती. तो दिल्लीवरून सतत त्यांना पैसा व सैन्य पाठवत होता. मात्र शिवाजीराजांनी आपल्या पराक्रमाने आणि वाणीने मराठा समाजात एकी निर्माण केली आणि त्यांच्यातील गुणांची वेळोवेळी कदर केली तसेच “मराठा तितुका मेळवावा” या सूत्राची जपणूक करून स्वातंत्र्य प्रेमी, व पराक्रमी, माणसांना एकत्रित केले. औरंगजेब हा जबरजस्त लष्करी सामर्थ्याचा पराक्रमी, कट्टर मुसलमानपंथीय व दक्षिणेतील राजकारणी माहिती असलेला बादशहा होता. पण शिवाजीने अफझलखाना सारख्या पराक्रमी मुसलमान सरदाराला यमसदनी पाठविल्या नंतर तो जिवंत असे पर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची छाती झाली नाही. शिवाजी राजांनी तानाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी, येसाजी आणि एकांपेक्षा ऐक जिवाला जीव देणारे मित्र गोळा केले. श्री रोहिडेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली. आणि एका स्वरांत घोषणा दिली. ” हर हर महादेव” महाराष्ट्रातल्या मावळखोर्यानपासून त्यांनी आपल्या प्रयत्नांना आरंभ केला. साम-दंड-भेद यांचा उपयोग करत वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजींनी ‘तोरणागड’जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. आणि मग त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. एका मागून एक गड आणि किल्ले जिंकून घेतले. युद्धात शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त केला. वाघनखांनी अफझलखानचा कोथळा काढला. पळून गेला म्हणून शाहिस्तेखान वाचला. शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करतांना येणाऱ्या हरेक संकटांला धीराने सामोरे गेलेच. पण त्यांचे सवंगडीही त्यांना समर्थ साथ देत होते. सिंहगड घेतांना तानाजी पडला . खिंड लढवितांना बाजीप्रभुणे छातीचा कोट केला . मुरारबाजी महाडकर, प्रतापराव गुजर अशा एकाहून एक शूर सवंगड्यानी आपल रक्त दिले. आपले प्राण दिले . स्वराज्य आकाराला आले. जिजामातेने पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आणले शिवाजीराजांनी.

सर्वसामान्य जनतेला आता “सिंहासनावर बसलेला आपला महाराजा” पाहायचा होता. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याचा आग्रह केला. महाराजांनी आपल्या मातेशी आणि जवळच्या सरदारांशी चर्चा करून राज्यभिषेक करवून घ्यायचा असे ठरवले. काशीचे प्रसिद्ध पंडित गागाभट्ट धार्मिक विधी करण्यासाठी आले. स्वराज्याची राजधानी रायगड ठरली. हिंदवी स्वराज्याचा राजा सिंहासनाव्रर बसला. लोकांनी जयजयकार केला. “छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ” शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक ६ जून, १६७४ साली रायगडावर साला. त्यानंतर थोड्याच काळात म्हणजे ६ वर्षानंतर ३ एप्रिल, १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *